शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे
त्याच किंकाळ्या तोच रक्तपात दिसू लागला पुन्हा
 सांग त्या निष्पापांचा काय होता गुन्हा
अपराध्यांचा  गळा घोट वंश त्यांचा संपू दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

सोंगे त्यांची फार झाली पुरे आता भाषणे
प्राण जातात गरिबांचे देतात नुसती अश्वासने
बजावून तू सांग त्यांना एकदा होऊन जाऊ दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

आधार त्यांचा हरपला अनाथ झाली लेकरे
पिसाळलेल्या कुत्र्यांना काय वाटेल खरे
सत्तेच्या लालसेचे वेड त्यांचे संपू दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

लोकशाहीचे रक्षण करते बघ कसे बनलेत फितूर
मताच्या या राजकारणात मतदार नाही चतुर
देशाच्या कल्याणाचे स्वप्न त्यांना पडू दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

सत्य प्रेम सदाचार हीच आमची प्रतीके
फुट आपल्यात पडण्यासाठी मांडतात ते गृहितके
झोपलेल्या जनतेची जागी अस्मिता होऊ दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

सांग त्या भ्याडांना पुन्हा हल्ला कराल तर
नाव सुद्धा राहणार नाही देशाचे तुमच्या पृथ्वीवर
तिरंग्याच्या साक्षीने रणांगण थंड होऊ दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

गाफिल बांधवांना राहिला तर  वाढेल आपली निष्क्रियता
साऱ्या जगाला दिसू द्या आपल्यातली एकात्मता
भारत भूचे आम्ही लेकरे प्रतीक्षा पुरी होऊ दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे
                                 प्रा. भागवत डुकरे


जायकवाडी धरण

जायकवाडी धरण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पैठण या ऐतिहासिक शहराच्या जवळ व व गोदावरी नदीवर बांधले...