गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

कांबी येथील महालक्ष्मी मंदिर : यादवकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेले कांबी हे गाव  प्राचीन  आणि ऐतिहासिक हेमाडपंथी महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध  आहे. गोदावरी काठाच्या या परिसराला पुर्वीच्या काळी काम्यक वन म्हणुन ओळखले जायचे असा उल्लेख काशीखंड कथासार या ग्रंथात केलेला आहे. तसेच काम्यक वनाच्या या परिसरात अनेक ॠषी,  मुनी,साधु,तपस्वी यांनी आश्रम स्थापुन वास्तव्य केले आहे.  महाराष्ट्रात बाराव्या शतकात यादव घराण्याचा उदय झाला. दृढ प्रहार हा राजा  यादव घराण्याचा संस्थापक होता व देवगिरी येथे या घराण्याची राजधानी होती.  या घराण्याच्या 
 कालखंडात कांबी व परिसरात अनेक मंदिराची निर्मिती यादव राजांनी केली. यादवांचा प्रधान हेमाद्री पंडित याचा या मंदिर निर्माण कार्यात महत्वाचा सहभाग होता. म्हणुन हेमाद्री पंडित यांच्या नावावरुन ही मंदिर निर्माणाची विशिष्ट मंदिर शैली हेमाडपंथी या नावाने ओळखली जाऊ लागली. ही स्थापत्यकला यादवांच्या काळात विकसित झाली असल्याने  या पध्दतीचे अनेक मंदिरे यादव राजांनी निर्माण केली आहेत. कांबी येेेेथील महालक्ष्मी मंंदिर ही यादव कालीन आहे. पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर भव्य आकाराचे आहे. मंदिरामध्ये अनेक ठिकाणी दगडांवरती शिल्पकाम केलेले आढळते.
येथील मंदिरात असलेली महालक्ष्मीची मूर्ती विलोभनीय आहे. ती दरवाजासमोर नसून ती छताला  कोरलेली आहे. तसेच या महालक्ष्मी मंदिरात एक शिवलिंग ही आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे या शिवलिंगाजवळ नंदी नाही. या मंदिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामध्ये आडव्या खांबावरती एक शिलालेख कोरलेला असुन त्यात  या मंदिराच्या निर्माण करणाऱ्या यादव राजाविषयी माहिती आहे.सुबक नक्षीकाम केलेले आहे.














संदर्भ ग्रंथ सुची
1) शोधमुद्रा- श्री. ब्रम्हानंद देशपांडे 
2) काशीखंड कथासार संपादक - श्री.श. रा. देवळे
प्रकाशन-शारदा साहित्य पुणे

जायकवाडी धरण

जायकवाडी धरण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पैठण या ऐतिहासिक शहराच्या जवळ व व गोदावरी नदीवर बांधले...