मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१
जायकवाडी धरण
जायकवाडी धरण
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील
प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पैठण या ऐतिहासिक शहराच्या जवळ व व गोदावरी नदीवर बांधलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या मातीच्या या धरणाला नाथसागर म्हणून ओळखले जाते हे जायकवाडी धरण जवळ जवळ दहा किलोमीटर रुंद आणि साठ किलोमीटर लांब आहे. जायकवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता 102 टीएमसी आहे. जायकवाडी धरणाचे 1965 या वर्षी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन बांधकाम सुरू झाले व 1976 यावर्षी धरणाचे काम पूर्ण झाले. व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. या धरणांमधून दोन कालवे काढण्यात आले त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर ती जलसिंचनाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. त्याच बरोबर या धरणामुळे पिण्याच्या पाण्याची ही समस्या मिटली आहे.
जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर गोदावरी नदी पात्रात होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदी काठावरील जमिनी सिंचनाखाली आल्या आहेत या धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी व्यवसाय चालतो त्यामुळे आर्थिक दृष्ट्या उत्पन्नाचा स्रोत म्हणूनही या धरणाचा उपयोग होतो या धरणाजवळ जलविद्युत निर्मिती प्रकल्पही आहे याद्वारे वीज निर्मिती केली जाते जायकवाडी धरणाच पाणलोट क्षेत्र खूप मोठे आहे तसेच जायकवाडी धरणाची साठवण क्षमता ही मोठी आहे यामुळे धरणांमध्ये साठवलेल्या मोठ्या प्रमाणातील पाण्याचा उपयोग मराठवाड्यातील दुष्काळी भागातील जमिनी सिंचनाखाली आणण्यासाठी झाला त्यामुळे जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील लोकांच्या दृष्टीने वरदानच ठरले आहे.
जायकवाडी धरण
जायकवाडी धरण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पैठण या ऐतिहासिक शहराच्या जवळ व व गोदावरी नदीवर बांधले...
-
. मुंगी-हजारो वर्षांचा इतिहास असणारे गाव भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळा...
-
जायकवाडी धरण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पैठण या ऐतिहासिक शहराच्या जवळ व व गोदावरी नदीवर बांधले...
-
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेले कांबी हे गाव प्राचीन आणि ऐतिहासिक हेमाडपंथी महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. गोदावरी काठाच...