मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

जायकवाडी धरण

जायकवाडी धरण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पैठण या ऐतिहासिक शहराच्या जवळ व व गोदावरी नदीवर बांधलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या मातीच्या या धरणाला नाथसागर म्हणून ओळखले जाते हे जायकवाडी धरण जवळ जवळ दहा किलोमीटर रुंद आणि साठ किलोमीटर लांब आहे. जायकवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता 102 टीएमसी आहे. जायकवाडी धरणाचे 1965 या वर्षी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन बांधकाम सुरू झाले व 1976 यावर्षी धरणाचे काम पूर्ण झाले. व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. या धरणांमधून दोन कालवे काढण्यात आले त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर ती जलसिंचनाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. त्याच बरोबर या धरणामुळे पिण्याच्या पाण्याची ही समस्या मिटली आहे. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर गोदावरी नदी पात्रात होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदी काठावरील जमिनी सिंचनाखाली आल्या आहेत या धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी व्यवसाय चालतो त्यामुळे आर्थिक दृष्ट्या उत्पन्नाचा स्रोत म्हणूनही या धरणाचा उपयोग होतो या धरणाजवळ जलविद्युत निर्मिती प्रकल्पही आहे याद्वारे वीज निर्मिती केली जाते जायकवाडी धरणाच पाणलोट क्षेत्र खूप मोठे आहे तसेच जायकवाडी धरणाची साठवण क्षमता ही मोठी आहे यामुळे धरणांमध्ये साठवलेल्या मोठ्या प्रमाणातील पाण्याचा उपयोग मराठवाड्यातील दुष्काळी भागातील जमिनी सिंचनाखाली आणण्यासाठी झाला त्यामुळे जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील लोकांच्या दृष्टीने वरदानच ठरले आहे.

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

कन्याकुमारी दर्शन

कन्याकुमारी दर्शन 
भारत हा विविधतेने नटलेला विविध सांस्कृतिक, धार्मिक सामाजिक, राजकीय परंपरा असलेला अनेक महापुरुष,विद्वान, ज्ञानी, योगी, साधू,ऋषी तपस्वी अशा महान  व्यक्तींची त्याचबरोबर अनेक विविधतेने नटलेल्या  सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या  ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या शहरांची तसेच पराक्रमी वीर शूर लोकांची भूमी आहे. या भूमीला आपल्या भौगोलिक विविधतेमुळे एक वेगळीच ओळख जागतिक   पातळीवरती मिळाली आहे. उत्तरेला असलेला उत्तुंग हिमालय आणि त्याच बरोबर दक्षिणेला असलेला हिंद महासागर  गंगेचा सुपीक मैदानी प्रदेश दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भाग या भागाच्या तिन्ही बाजूला असलेला महासागर आणि आणि या महासागरामुळे समृद्ध झालेला किनारा तसेच या किनार्‍यावरती असलेली वैशिष्ट्यपूर्ण शहरे, गावे ही भारताच्या वैभव शाली इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहेत. आशाच  वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कन्याकुमारी या  ठिकाणाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.भारतातील तामिळनाडू या राज्यांमध्ये हे ठिकाण आहे आणि ते भारताच्या दक्षिणेकडील भागाचे  शेवटचे टोक आहे. 
  एका दिवसात पाहून होईल असं हे ठिकाण आहे येथे असलेले स्वामी विवेकानंद स्मारक त्रिवेणी संगम महात्मा गांधी स्मारक संत कवी तिरुवल्लुवर स्मारक स्वामी विवेकानंद केंद्र त्याच बरोबर सुचिंद्रम मंदिर या ठिकाणी होत असलेले सूर्योदय आणि सूर्यास्त याचे नयनरम्य दृश्य ही या ठिकाणचे वैशिष्ट्य आहेत.

कन्याकुमारीला कसे पोहचाल
रेल्वे 
महाराष्ट्र मधून रेल्वेने कन्याकुमारीला जाण्यासाठी अनेकशहरांमधून थेट ट्रेन आहेत. कन्याकुमारी रेल्वे स्थानकापासून सर्वच स्थळे जवळच आहे त्यामुळे
शकतो कन्याकुमारी मध्ये सकाळी लवकर पोहोचणारी ट्रेन निवडावी त्यामुळे आपणास कन्याकुमारी मधील सर्व स्थळे व्यवस्थित पाहता येतील
विमान 
कन्याकुमारीला विमानाने जाता येते त्यासाठी महाराष्ट्रा मधून अनेक शहरांमधून विमानसेवा उपलब्ध आहे केरळ मधील त्रिवेंद्रम पर्यंत विमानाने जाता येईल त्यानंतर टॅक्सी किंवा बसणे त्रिवेंद्रम ते कन्याकुमारी हे अंतर पार करावे लागेल

राहण्याची व्यवस्था 
कन्याकुमारी हे अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे याठिकाणी अत्यंत कमी दरामध्ये राहण्याची व्यवस्था होते. 

कन्याकुमारी मधील प्रेक्षणीय स्थळे


स्वामी विवेकानंद शिला स्मारक
समुद्रामध्ये खडकावरती असलेले हे अत्यंत सुंदर स्मारक आहे या स्मारकाला पाहण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती गर्दी होत असल्याने शक्यतो सकाळी लवकर तिकीट घेण्यासाठी रांगेत येऊन थांबावे म्हणजे सकाळी आपणाला शांतते मध्ये  स्मारकाचे दर्शन घेता येईल. त्याचबरोबर शांततामय वातावरणामध्ये खडकाला आदळणार्‍या  लाटांचा आवाज अनुभवता येईल. स्मारकाकडे जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागत असल्याने बोटीचे तिकीट काढल्यानंतर एका मोठ्या रांगे मधून आपण बोटी जवळ पोहोचतो. बोटीत चढण्यापूर्वी आपण  लाईफ जॅकेट घालणे गरजेचे आहे. दहा मिनिटाच्या समुद्र प्रवासानंतर आपण  स्मारकाजवळ पोहोचतो.  याठिकाणी स्वामी विवेकानंदांनी ध्यानधारणा केली होती त्यामुळे हे स्मारक उभारले आहे जगभरामध्ये या स्मारकाला भेट देण्यासाठी लोक येत असतात. अत्यंत सुंदर असलेले हे स्मारक शांततामय वातावरणात आणखीनच सुखावते याठिकाणी आपण फोटोग्राफी करू शकता.
संत कवी तिरुवल्लुवर स्मारक
विवेकानंद स्मारकावरून परतताना शेजारी असलेल्या संत कवी तिरुवल्लुवर यांच्या  स्मारकाचे आपणाला दर्शन घेता येते तिरुवल्लुवर हे तामिळ मधील प्रसिद्ध संत कवी होते त्यांचे हे स्मारक  आहे.
त्रिवेणी संगम
याठिकाणी अरबी सागर,बंगालचा उपसागर,आणि हिंद महासागर या तिन्ही सागराचा संगम येथे आहे.
महात्मा गांधी  स्मारक
 याठिकाणी महात्मा गांधी यांच्या अस्थी समुद्रामध्ये विसर्जित करण्याअगोदर ठेवल्या होत्या या जागेवरती  महात्मा गांधी यांचे स्मारक आहे 
 कामराजार मंडपम
 दक्षिण भारतातील गांधी म्हणून ज्यांची ओळख आहे अशा कामराज यांच्या  स्मारकाला कमराजार मंडपम असं म्हटलं जाते
कन्याकुमारी माता मंदिर
समुद्राच्या किनाऱ्यावर ती असलेलं हे सुंदर मंदिर आहे माता अमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी पुरुषांनी शर्ट काढून जावे लागते त्याच बरोबर मंदिराबाहेर प्रसाद फुलं यांचे दुकान आहे तसेच या परिसरामध्ये आपण अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करू शकतो

सुनामी स्मारक सुनामी मध्ये बळी प्राण गमावलेल्या हजारो लोकांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधले आहे

















गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

कांबी येथील महालक्ष्मी मंदिर : यादवकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेले कांबी हे गाव  प्राचीन  आणि ऐतिहासिक हेमाडपंथी महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध  आहे. गोदावरी काठाच्या या परिसराला पुर्वीच्या काळी काम्यक वन म्हणुन ओळखले जायचे असा उल्लेख काशीखंड कथासार या ग्रंथात केलेला आहे. तसेच काम्यक वनाच्या या परिसरात अनेक ॠषी,  मुनी,साधु,तपस्वी यांनी आश्रम स्थापुन वास्तव्य केले आहे.  महाराष्ट्रात बाराव्या शतकात यादव घराण्याचा उदय झाला. दृढ प्रहार हा राजा  यादव घराण्याचा संस्थापक होता व देवगिरी येथे या घराण्याची राजधानी होती.  या घराण्याच्या 
 कालखंडात कांबी व परिसरात अनेक मंदिराची निर्मिती यादव राजांनी केली. यादवांचा प्रधान हेमाद्री पंडित याचा या मंदिर निर्माण कार्यात महत्वाचा सहभाग होता. म्हणुन हेमाद्री पंडित यांच्या नावावरुन ही मंदिर निर्माणाची विशिष्ट मंदिर शैली हेमाडपंथी या नावाने ओळखली जाऊ लागली. ही स्थापत्यकला यादवांच्या काळात विकसित झाली असल्याने  या पध्दतीचे अनेक मंदिरे यादव राजांनी निर्माण केली आहेत. कांबी येेेेथील महालक्ष्मी मंंदिर ही यादव कालीन आहे. पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर भव्य आकाराचे आहे. मंदिरामध्ये अनेक ठिकाणी दगडांवरती शिल्पकाम केलेले आढळते.
येथील मंदिरात असलेली महालक्ष्मीची मूर्ती विलोभनीय आहे. ती दरवाजासमोर नसून ती छताला  कोरलेली आहे. तसेच या महालक्ष्मी मंदिरात एक शिवलिंग ही आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे या शिवलिंगाजवळ नंदी नाही. या मंदिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामध्ये आडव्या खांबावरती एक शिलालेख कोरलेला असुन त्यात  या मंदिराच्या निर्माण करणाऱ्या यादव राजाविषयी माहिती आहे.सुबक नक्षीकाम केलेले आहे.














संदर्भ ग्रंथ सुची
1) शोधमुद्रा- श्री. ब्रम्हानंद देशपांडे 
2) काशीखंड कथासार संपादक - श्री.श. रा. देवळे
प्रकाशन-शारदा साहित्य पुणे

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे
त्याच किंकाळ्या तोच रक्तपात दिसू लागला पुन्हा
 सांग त्या निष्पापांचा काय होता गुन्हा
अपराध्यांचा  गळा घोट वंश त्यांचा संपू दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

सोंगे त्यांची फार झाली पुरे आता भाषणे
प्राण जातात गरिबांचे देतात नुसती अश्वासने
बजावून तू सांग त्यांना एकदा होऊन जाऊ दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

आधार त्यांचा हरपला अनाथ झाली लेकरे
पिसाळलेल्या कुत्र्यांना काय वाटेल खरे
सत्तेच्या लालसेचे वेड त्यांचे संपू दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

लोकशाहीचे रक्षण करते बघ कसे बनलेत फितूर
मताच्या या राजकारणात मतदार नाही चतुर
देशाच्या कल्याणाचे स्वप्न त्यांना पडू दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

सत्य प्रेम सदाचार हीच आमची प्रतीके
फुट आपल्यात पडण्यासाठी मांडतात ते गृहितके
झोपलेल्या जनतेची जागी अस्मिता होऊ दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

सांग त्या भ्याडांना पुन्हा हल्ला कराल तर
नाव सुद्धा राहणार नाही देशाचे तुमच्या पृथ्वीवर
तिरंग्याच्या साक्षीने रणांगण थंड होऊ दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे

गाफिल बांधवांना राहिला तर  वाढेल आपली निष्क्रियता
साऱ्या जगाला दिसू द्या आपल्यातली एकात्मता
भारत भूचे आम्ही लेकरे प्रतीक्षा पुरी होऊ दे
फोड वाचा अन्यायाला न्यायदेवते न्याय दे
                                 प्रा. भागवत डुकरे


सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा असणारे गाव- मुंगी



.                    
                            
मुंगी-हजारो वर्षांचा इतिहास असणारे गाव 
 

भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून नद्यांना खूप महत्त्व आहे.  नद्यांच्या किनारी अनेक संस्कृत्या उदयाला आल्या आणि लोपही पावल्या त्याच बरोबर अनेक गावे नद्यांच्या किनारी वसलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने गोदावरी नदी काठी गोदा संस्कृतीचा उदय झाला. गोदावरी नदी काठी अनेक गावे वसली. या गावांना प्राचीन काळापासून प्रचंड धार्मिक, ऐतिहासिक,सामाजिक, राजकीय, आर्थिक महत्त्व आहे.   त्यापैकी
महाराष्ट्रातील अनेक गावांचा इतिहास हा वैशिष्टय़पूर्ण आहे. त्या असाच  वैशिष्टय़पूर्ण ऐतिहासिक वारसा  व  धार्मिक  महत्व असणारे मुंगी हे गाव आहे.  पैठण या  ऐतिहासिक  शहरापासून  12 किलोमीटर अंतरावर असलेल्या   मुंगी या गावालाही प्राचीन इतिहास आहे. पूर्वीच्या काळी  या गावाला  पैठण शहरा सारखेच महत्त्व होते  इतिहासामध्ये नवा अध्याय लिहिणारे हे गाव प्रशासकीय दृष्ट्या  शेवगाव तालुक्यात आहे. मुंगी हे दक्षिण गंगा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या  गोदावरी नदीच्या काठावर वसलेले गाव, या गावाला हजारो वर्षाची ऐतिहासिक पार्श्वभुमी असल्याने हे गाव प्राचीन आहे. या गाव ची ग्रामदेवता ही मुंगादेवी आहे दरवर्षी या मुंगादेवीची यात्रा भरत असते. यात्रेला कोकणा मधून ही भाविक भक्त  येत असतात.
मुंगी या गावाचे नाव प्राचीन काळी पिपीलिका हे होते कारण याठिकाणी दधीचि ऋषि यांचा मुलगा पिप्यलाद याने पिपीलिकेश्वर महादेवाची स्थापना केली त्यानंतर या परिसराला पिपीलिकेश्वर असे म्हटले जाऊ लागले यासंबंधी उल्लेख काशीखंड कथासार या ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे. त्याच बरोबर
अनेक ठिकाणी मुंगी आणि पैठण या परिसराचा एकत्रितरीत्या उल्लेख येतो. तसेच अनेक ग्रंथांमध्ये या परिसराला प्राचीन काळी वैदूर्य पतन असं म्हटलं जात होतं असा उल्लेख आहे अनेक वर्षापासुनच मुंगी गावाचे नाव मुंगी -पैठण,मुंगी- शेवगाव या नगरांशी जोडलेले आहे अनेक संत,महापुरुष,विद्वान यांचे जन्मगाव हे मुंगी आहे.
1863 साली  येथे संशोधकांना अश्मयुगातील मानवाने बनवलेले दगडी हत्यार सापडली. (1) त्याच बरोबर जवळच्या गोदावरी नदी पात्रात ही प्राचीन अवशेष सापडल्याचे गावकरी सांगतात  म्हणजेच मुंगी गावच्या परिसरात अश्मयुगीन कालखंडापासुनच मानवाच्या वसाहतीचे केंद्र होते. अश्मयुगीन कालखंडापासून या परिसरात मानवी वस्ती असल्याचे अनेक पुरावे संशोधकांना मिळाले आहे. या परिसरामध्ये महाराष्ट्रातील अश्मयुगीन काळाचे सुरुवातीचे अवशेष मिळाल्याने महाराष्ट्राच्या अश्मयुगीन काळाच्या इतिहास लेखनाला सुरुवात ही मुंगी गावच्या परिसरातून मिळालेल्या अवशेषांच्या आधारे झाली आहे.या परिसरामध्ये आजही मंदिरांचे प्राचीन अवशेष आढळतात निम्बार्क संप्रदायाचे प्रवर्तक श्री भगवान निम्बार्काचार्य यांचा जन्म मुंगी या गावातच झाल्याचे मानले जाते.
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे बंधू विठोजीराजे भोसले यांना मुंगी गावाची जहागिरी मिळाली होती.
 पहिले बाजीराव पेशवे  व हैदराबादचा निजाम यांच्यात पालखेड येथे लढाई झाली होती. या लढाईत पराभुत झालेल्या निजामाने मुंगी गावातच तह स्वीकारला. तो तह 'मुंगी-शेवगाव' चा तह म्हणुनच ओळखला जातो.
 मुंगी या गावामध्ये विणकर लोकांची मोठी वस्ती होती व हे विणकर लोक पैठणी विणण्याचे काम करत तसेच पैठणीला लागणारा कच्चामाल मुंगी गावातून पुरवला जायचा असे गावातील जेष्ठ नागरिक सांगतात.
त्यामुळे मुंगीकरांनी आपल्या गावच्या वैभवशाली इतिहासाचे संकलन करणे गरजेचे आहे.
                                प्रा. भागवत डुकरे








                            मुंगादेवी मंदिर


                                
                            मुंगादेवी

               श्री भगवान निम्बरकाचार्य मंदिर

                      गोदावरी नदी पात्र



                        राजे भोसले यांची वंशावळ
                 राजे भोसले यांचा राजवाडा




संदर्भ ग्रंथ सुची
1) मराठी विश्वकोश https://vishwakosh.marathi.gov.in/40977/
2) काशीखंड कथासार संपादक - श्री.श. रा. देवळे
प्रकाशन-शारदा साहित्य पुणे
3) लोकराज्य मासिक 1994 (राजर्षी शाहू महाराज राज्यारोहण शताब्दी विशेषांक)
4) श्री भगवान निम्बरकाचार्य जीवन चरित्र लेखक - श्री. डॉ. प्रशांत जोशी प्रकाशक निंबार्क भूषण प्रा. श्री.सुरेश जोशी अनुराधा प्रकाशन पैठण
5) जगद्गुरु भगवान श्री निम्बरकाचार्य जन्मभूमी मुंगी पैठण क्षेत्र पिपिलिका लेखक- श्री. साहेबराव गायकवाड गुरुजी प्रकाशक प्राध्यापक श्री. चंद्रकांत साहेबराव गायकवाड औरंगाबाद
6) वारसा लेखक- श्री भाऊसाहेब थोरात  शब्दगंध प्रकाशन अहमदनगर

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

इतिहास विषयात करिअर Career in History

 आपली भारतीय संस्कृती अतिप्राचीन संस्कृती आहे भारतीय भूमीनी  अनेक संस्कृत्यांना  आपल्या कुशीमध्ये  खेळवल आहे भारतीय संस्कृती बद्दल आपल्याला अधिक माहिती करायची असेल तर इतिहासाचे पाने उघडून पहावी लागतात इतिहास हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल किंवा त्यामध्ये करिअर करायचे असेल तर या विषयाबद्दल आपलं ज्ञान वाढवणे गरजेचे आहे त्याचबरोबर इतिहास विषयाला करिअर म्हणून निवडण्यासाठी साठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे त्यामध्ये बारावी नंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थी हा आर्टला  प्रवेश घेऊ शकतो त्यामुळे तुम्हाला  आर्टला प्रवेश घेऊन इतिहास विषय स्पेशल घ्यावा लागेल. तीन वर्ष अभ्यास आणि  परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर  तुम्हाला बीएची पदवी मिळते नंतर बीएड करून तुम्ही इतिहास विषयांमध्ये करिअर करू शकता त्याचबरोबर बीए नंतर इतिहास विषयांमध्ये एम ए करून त्यानंतर सेट किंवा नेट या यूजीसी द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही इतिहास विषयाचे प्राध्यापक बनू शकता तसेच इतिहास संशोधक म्हणूनही तुम्ही कार्य करू शकता त्याच बरोबर तुम्ही तुमची पुस्तके लिहू शकता तसेच सरकारच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या किंवा इतिहासाची निगडीत संस्था वरती तुम्ही काम करू शकता. इतिहास तज्ञ लोकांची आवश्यकता अनेक क्षेत्रांमध्ये आहे जसे की फिल्म इंडस्ट्री या इंडस्ट्रीमध्ये नवनवीन मालिका चित्रपट हे येत असतात या या मालिका आणि चित्रपटांच्या निर्मिती वेळी जर चित्रपट किंवा मालिका  या ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या असतील तर त्या ठिकाणी इतिहास तज्ञ लोकांचा सल्ला मार्गदर्शन या गोष्टीची आवश्यकता असते असते म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये  इतिहास तज्ज्ञ लोकांची मोठ्या प्रमाणावरती आवश्यकता असते तसेच इतिहास विषय अनेक विषयांशी निगडित असल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयाचा मार्क्स मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती उपयोग होतो म्हणून एमपीएससी यूपीएससी यासारख्या परीक्षांमध्ये इतिहास विषयी घेऊन उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे या परीक्षांमध्ये इतिहासाला अत्यंत महत्त्व आहे म्हणून इतिहास विषय घेऊन तुम्ही जर बीए किंवा एम ए केलेल असेल तर स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला आपलं करियर करता येऊ शकत त्याचबरोबर इतिहास विषय बीए किंवा एम ए उत्तीर्ण असलेल्यांना संग्रहालयामध्ये क्युरेटर म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध असते आहे तसेच इतिहासाचा विद्यार्थी पुरातत्त्व विद्या मध्ये आपले करिअर करू शकतो जर इतिहास विषयातून तुम्ही एम ए उत्तीर्ण झालात तर भारतीय पुरातत्व खात्याअंतर्गत पुरातत्त्व विद्या बद्दलची अनेक डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहे त्याच बरोबर अनेक विद्यापीठांमध्ये पुरातत्त्व विद्या चे कोर्सेस उपलब्ध उपलब्ध आहेत

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

एमपीएससी परीक्षा MPSC Exam

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारला आवश्यक असणाऱ्या पदांची भरती केली जाते महाराष्ट्र  लोकसेवा आयोग या पदांची भरती करण्यासाठी राज्यस्तरावर  स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करतो या परीक्षांद्वारे गुणवत्ताप्राप्त उमेदवाराची निवड योग्य त्या पदासाठी केली जाते या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात दरवर्षी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीद्वारे उमेदवारांना परीक्षेसंदर्भातील माहिती देत असतो या माहितीच्या आधारे पात्र उमेदवार त्या त्या  पदासाठी अर्ज करतात त्यानंतर पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शिफारस अंतिम निवडीसाठी सरकारकडे केली जाते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या परीक्षांचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर परीक्षा संदर्भात शैक्षणिक पात्रता वय आरक्षण पण इत्यादी संबंधी माहिती ती सविस्तर पणे संकेतस्थळावरती  दिलेली आहे
तुम्ही आत्ता नुकतीच दहावी किंवा बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असाल आणि भविष्यामध्ये तुम्हाला या एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करायचे असेल तर आतापासूनच काही गोष्टी या जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे त्यामध्ये प्रमुख्याने तुम्ही जर नुकतीच बारावी उत्तीर्ण झालेला असाल तर तुम्ही या परीक्षेला पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना पात्र ठरतात म्हणून बारावीनंतर जवळजवळ अडीच तेच ते तीन वर्षाचा कालावधी तुमच्या हातामध्ये असतो तसेच जर तुम्ही दहावीनंतर या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रयत्न करत असाल तर साधारणत पाच वर्षाचा कालावधी तुम्हाला या परीक्षेच्या तयारीसाठी तुमच्या हातामध्ये असतो म्हणून हातामध्ये असलेल्या वेळेचा योग्य असा सदुपयोग होणे गरजेचे आहे म्हणजेच या तीन ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर कठोर परिश्रम घेतले म्हणजेच मन लावून या परीक्षांचा  अभ्यास केला तर पदवी प्राप्त केल्यानंतर लवकरच तुम्ही  ही परीक्षा  उत्तीर्ण  झालेले असू शकता म्हणून आतापासूनच नियोजनपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे तरच अत्यंत कमी कालावधी मध्ये वर्ग 1 किंवा वर्ग 2 चे अधिकारी आपण बनू शकता त्यासाठी दहावी किंवा बारावीनंतर या तयारीला सुरुवात करायची असेल तर काही महत्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे त्यामध्ये प्रथमतः तुमचा जो अभ्यास दहावी किंवा बारावीचा अभ्यास सुरू आहे तो सुरुवातीला योग्य पद्धतीने करा त्यानंतर मिळालेल्या वेळेमध्ये आतापासूनच इयत्ता पहिलीपासून ते  पदवीपर्यंतचे जे काही या परीक्षांच्या दृष्टीने  महत्त्वपूर्ण असलेल्या  विषयाचे पुस्तके आहेत ते अभ्यासायला सुरुवात करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रमुख्याने राज्यसेवा परीक्षा आणि पीएसआय एसटीआय आणि ए एस ओ यांच्यासाठी संयुक्तपणे एकत्र परीक्षा घेतली जाते या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम वेगळा असून त्या पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत अशा  वेगवेगळ्या टप्प्यावर घेतली जाते 
राज्यसेवा परीक्षा
ही परीक्षा पूर्व मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यावर घेतली जाते.

जायकवाडी धरण

जायकवाडी धरण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पैठण या ऐतिहासिक शहराच्या जवळ व व गोदावरी नदीवर बांधले...