कन्याकुमारी दर्शन
भारत हा विविधतेने नटलेला विविध सांस्कृतिक, धार्मिक सामाजिक, राजकीय परंपरा असलेला अनेक महापुरुष,विद्वान, ज्ञानी, योगी, साधू,ऋषी तपस्वी अशा महान व्यक्तींची त्याचबरोबर अनेक विविधतेने नटलेल्या सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या शहरांची तसेच पराक्रमी वीर शूर लोकांची भूमी आहे. या भूमीला आपल्या भौगोलिक विविधतेमुळे एक वेगळीच ओळख जागतिक पातळीवरती मिळाली आहे. उत्तरेला असलेला उत्तुंग हिमालय आणि त्याच बरोबर दक्षिणेला असलेला हिंद महासागर गंगेचा सुपीक मैदानी प्रदेश दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भाग या भागाच्या तिन्ही बाजूला असलेला महासागर आणि आणि या महासागरामुळे समृद्ध झालेला किनारा तसेच या किनार्यावरती असलेली वैशिष्ट्यपूर्ण शहरे, गावे ही भारताच्या वैभव शाली इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहेत. आशाच वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कन्याकुमारी या ठिकाणाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.भारतातील तामिळनाडू या राज्यांमध्ये हे ठिकाण आहे आणि ते भारताच्या दक्षिणेकडील भागाचे शेवटचे टोक आहे.
एका दिवसात पाहून होईल असं हे ठिकाण आहे येथे असलेले स्वामी विवेकानंद स्मारक त्रिवेणी संगम महात्मा गांधी स्मारक संत कवी तिरुवल्लुवर स्मारक स्वामी विवेकानंद केंद्र त्याच बरोबर सुचिंद्रम मंदिर या ठिकाणी होत असलेले सूर्योदय आणि सूर्यास्त याचे नयनरम्य दृश्य ही या ठिकाणचे वैशिष्ट्य आहेत.
कन्याकुमारीला कसे पोहचाल
रेल्वे
महाराष्ट्र मधून रेल्वेने कन्याकुमारीला जाण्यासाठी अनेकशहरांमधून थेट ट्रेन आहेत. कन्याकुमारी रेल्वे स्थानकापासून सर्वच स्थळे जवळच आहे त्यामुळे
शकतो कन्याकुमारी मध्ये सकाळी लवकर पोहोचणारी ट्रेन निवडावी त्यामुळे आपणास कन्याकुमारी मधील सर्व स्थळे व्यवस्थित पाहता येतील
विमान
कन्याकुमारीला विमानाने जाता येते त्यासाठी महाराष्ट्रा मधून अनेक शहरांमधून विमानसेवा उपलब्ध आहे केरळ मधील त्रिवेंद्रम पर्यंत विमानाने जाता येईल त्यानंतर टॅक्सी किंवा बसणे त्रिवेंद्रम ते कन्याकुमारी हे अंतर पार करावे लागेल
राहण्याची व्यवस्था
कन्याकुमारी हे अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे याठिकाणी अत्यंत कमी दरामध्ये राहण्याची व्यवस्था होते.
कन्याकुमारी मधील प्रेक्षणीय स्थळे
स्वामी विवेकानंद शिला स्मारक
समुद्रामध्ये खडकावरती असलेले हे अत्यंत सुंदर स्मारक आहे या स्मारकाला पाहण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती गर्दी होत असल्याने शक्यतो सकाळी लवकर तिकीट घेण्यासाठी रांगेत येऊन थांबावे म्हणजे सकाळी आपणाला शांतते मध्ये स्मारकाचे दर्शन घेता येईल. त्याचबरोबर शांततामय वातावरणामध्ये खडकाला आदळणार्या लाटांचा आवाज अनुभवता येईल. स्मारकाकडे जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागत असल्याने बोटीचे तिकीट काढल्यानंतर एका मोठ्या रांगे मधून आपण बोटी जवळ पोहोचतो. बोटीत चढण्यापूर्वी आपण लाईफ जॅकेट घालणे गरजेचे आहे. दहा मिनिटाच्या समुद्र प्रवासानंतर आपण स्मारकाजवळ पोहोचतो. याठिकाणी स्वामी विवेकानंदांनी ध्यानधारणा केली होती त्यामुळे हे स्मारक उभारले आहे जगभरामध्ये या स्मारकाला भेट देण्यासाठी लोक येत असतात. अत्यंत सुंदर असलेले हे स्मारक शांततामय वातावरणात आणखीनच सुखावते याठिकाणी आपण फोटोग्राफी करू शकता.
संत कवी तिरुवल्लुवर स्मारक
विवेकानंद स्मारकावरून परतताना शेजारी असलेल्या संत कवी तिरुवल्लुवर यांच्या स्मारकाचे आपणाला दर्शन घेता येते तिरुवल्लुवर हे तामिळ मधील प्रसिद्ध संत कवी होते त्यांचे हे स्मारक आहे.
त्रिवेणी संगम
याठिकाणी अरबी सागर,बंगालचा उपसागर,आणि हिंद महासागर या तिन्ही सागराचा संगम येथे आहे.
महात्मा गांधी स्मारक
याठिकाणी महात्मा गांधी यांच्या अस्थी समुद्रामध्ये विसर्जित करण्याअगोदर ठेवल्या होत्या या जागेवरती महात्मा गांधी यांचे स्मारक आहे
कामराजार मंडपम
दक्षिण भारतातील गांधी म्हणून ज्यांची ओळख आहे अशा कामराज यांच्या स्मारकाला कमराजार मंडपम असं म्हटलं जाते
कन्याकुमारी माता मंदिर
समुद्राच्या किनाऱ्यावर ती असलेलं हे सुंदर मंदिर आहे माता अमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी पुरुषांनी शर्ट काढून जावे लागते त्याच बरोबर मंदिराबाहेर प्रसाद फुलं यांचे दुकान आहे तसेच या परिसरामध्ये आपण अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करू शकतो
सुनामी स्मारक सुनामी मध्ये बळी प्राण गमावलेल्या हजारो लोकांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधले आहे

