रविवार, २० सप्टेंबर, २०२०

मध्ययुगीन इतिहासाची साक्षीदार 'हातगावची गढी'

 मध्ययुगीन इतिहासाची साक्षीदार  'हातगावची गढी'

मध्ययुगीन कालखंडात वतनदारी व्यवस्था प्रबळ होती. त्यातूनच गाव पातळीवर वतनदार, पाटील,जहागीरदार इ. मंडळींचा उदय झाला. हे लोक आपल्या वतनाचे राजेच असत गावातील  प्रशासन व्यवस्था, महसुल व्यवस्था  यांचा कारभार सांभाळत  असत. आपल्या  निवासाच्या  सोयीसाठी अनेक वतनदारांनी या काळात गढया बांधल्या होत्या. गढी म्हणजे  जमिनीवरील लहान आकाराचा किल्लाच असे. या गढीत संकटसमयी गावातील  सर्व लोक एकत्र सामावू शकत असत. या काळात अनेक  आक्रमक गावे लुटून नेत असत त्यामुळे त्यांच्यापासून संरक्षणासाठी गावकऱ्यांना या गढ्यांचा उपयोग होत असे.
 अशाच प्रकारची गढी शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे आहे. येथील भराट पाटलांची ही गढी मध्ययुगीन इतिहासाची साक्षीदार आहे. या गढीचा आकार चौकौनाकृती असुन गढीला चार भक्कम बुरुज आहेत. गढीचे बांधकाम दगड आणि विटांमध्ये केलेले आहे. सांडपाणी वाहुन जाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था केलेली आहे. धान्य साठवण्यासाठी कोठारे ही गढी मध्ये होती. गढीचे प्रवेशद्वार बळकट आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी गढी मध्ये आडही होता. गढीच्या  बाहेरील बाजूस घोडे बांधण्यासाठी व्यवस्था केलेली आढळते. गढी मध्ये अनेक ठिकाणी सुंदर नक्षीकाम केलेले आढळून येते. आजही गढीची तटबंदी भक्कम आहे.
 या ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन व्हावे 

                                  
                             
                          गढी

                   मुख्य प्रवेशद्वार 

                  आतील दृष्य 
                   आतील दृष्य

                 सुंदर नक्षीकाम 


साभार: सर्व फोटो श्री. गिरीश भराट यांनी काढले आहेत 

                                   


जायकवाडी धरण

जायकवाडी धरण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पैठण या ऐतिहासिक शहराच्या जवळ व व गोदावरी नदीवर बांधले...