मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

NTA UGC NET HISTORY नेट सेट

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो

वरिष्ठ महाविद्यालयात अधिव्याख्याता व्हायचे असेल तर त्यासाठी नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते शिक्षणामुळे मानवाचा सर्वांगीण विकास होतो तसेच भावी नेतृत्व शिक्षणामुळेच तयार होते यासाठी त्यांना घडवणारे शिक्षकही त्याच्या उच्च दर्जाचे असावेत म्हणून यूजीसी राष्ट्रीय स्तरावर नेट व राज्यस्तरावर सेट परीक्षा घेत आहे इतिहास विषयात जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत यासाठी ही लेखमाला लिहीत आहे. सेट आणि नेट या परीक्षांसाठी इतिहास या विषयातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ब्लॉगच्या माध्यमातून सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे इतिहास विषयातून नेट परीक्षेची तयारी करताना काही बाबी ध्यानात घेणे गरजेचे आहे भारतीय इतिहासाचा आणि जागतिक इतिहासाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की अभ्यासाच्या सोयीसाठी या इतिहासाचे तीन भागांमध्ये विभाजन केलेले आढळते त्यामध्ये प्रामुख्याने प्राचीन इतिहासाचा काळ मध्ययुगीन इतिहासाचा काळ आणि आधुनिक इतिहासाचा काळ असे तीन भाग पडतात त्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन आधुनिक इतिहासाच्या संदर्भात भारताच्या आणि जगाच्या इतिहासाचा कालखंड हा वेगवेगळा आहे. परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून आपणाला अभ्यास करायचा असल्याने आपण या बाबी ध्यानात घेणे गरजेचे आहे सेट नेट  परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रागैतिहासिक काळापासून अश्मयुग पुराश्मयुग मध्याश्मयुग तसेच प्राचीन काळ मध्ययुगीन काळ आधुनिक काळ यामधील महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास करणे गरजेचा आहे.

 इतिहास विषयाचा अभ्यास करताना इतिहास विषयाकडे दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहून अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यातील एक बाब म्हणजे भूगोल आणि दुसरी बाब म्हणजे कालक्रम होय. या दोन गोष्टी इतिहास वर परिणाम करत असतात  भारतातील भौगोलिक परिस्थिती ही आजच्या भारताच्या इतिहासाच्या काळात महत्त्वपूर्ण ठरलेली आहे उदाहरणार्थ हिमालय पर्वतामुळे अनेक परकीय आक्रमणापासून भारताचे निसर्गतः संरक्षण झाले आहे त्यामुळे अभ्यास करताना  प्रदेश देश यांची भौगोलिक भौगोलिक रचनाही लक्षात घेणे गरजेचे असते त्याचबरोबर योग्य अशा कालक्रमामुळे इतिहासाचा अभ्यास करणे सुकर झालेला आहे म्हणून अभ्यास करताना ऐतिहासिक घटना प्रसंग इत्यादी चे योग्य कालक्रम त्या ठिकाणी लावावे.
भूगोल आणि कालक्रम या दोन नेत्रांनी इतिहासाकडे खऱ्याअर्थाने पाहणे गरजेचे आहे
इतिहासाची पुनरावृत्ती होत असते या गोष्टीचा आपणाला इतिहासाचा अभ्यास करताना अनुभव नक्कीच येईल कारण भारताचा इतिहास पाहिला तर प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत असे लक्षात येते की एखाद्या जागी एखादी संस्कृती उदयाला आली तर कालांतराने त्या  संस्कृतीचा त्या ठिकाणी  अस्त झालेला आढळतो त्यानंतर  दुसरी एखादी संस्कृती त्यावरती आक्रमण करून त्याच संस्कृतीला नष्ट करते आणि नवी एखादी संस्कृती त्या ठिकाणी उदयाला येते अशाप्रकारे इतिहास स्वतःची त्याठिकाणी पुनरावृत्ती करत असतो प्राचीन इतिहासामध्ये शहरीकरणाच्या बाबतीत किंवा नागरीकरणाच्या बाबतीमध्ये अनेकदा अशा घटना त्या ठिकाणी घडून आल्या आहेत.

जायकवाडी धरण

जायकवाडी धरण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पैठण या ऐतिहासिक शहराच्या जवळ व व गोदावरी नदीवर बांधले...